अभिनेते प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढविणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करणारे प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करणारे प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश राज यांनी ट्विट करत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाला पसंती न देता अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अब की बार जनता की सरकार असे म्हटले आहे. प्रकाश राज यांनी सतत मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका केलेली आहे.
 

प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुमच्या पाठिंब्यामुळे मी नवी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. आगामी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे. लवकरच मी मतदारसंघाची घोषणा करेल. संसदेतही असेल अब की बार जनता की सरकार.

Web Title: Prakash Raj film star and fierce BJP critic jumps into 2019 poll battle