'अतिशय लाजिरवाणं, आता तरी लोकांनी...' प्रकाश राज यांना संताप अनावर! |Rahul Gandhi Disqualification : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Raj tollywood actor on Rahul Gandhi Disqualification

Rahul Gandhi Disqualification : 'अतिशय लाजिरवाणं, आता तरी लोकांनी...' प्रकाश राज यांना संताप अनावर!

Prakash Raj tollywood actor on Rahul Gandhi Disqualification : टॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेची आहे. बॉलीवूडमध्ये ते प्रख्यात दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिंघममधील जयकांत शिकरेच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले होते. प्रकाश राज यांची राहुल गांधींच्या खासदारकी रद्द झाल्यानंतरची प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.

प्रकाश राज यांच्या परखड आणि सडेतोड प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या त्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरुन केलेली कमेंट ही अनेकांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर गांधींवर गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयानं त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र आज तर त्यांची खासदारकी रद्द झाल्याच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

राहुल गांधी यांच्या त्या बातमीवर देशातील विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर, कुणाल कामरा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी देशाच्या सध्याच्या राजकारणावरुन कडाडून टीका केली आहे.

प्रकाश राज म्हणाले की, माझ्या प्रिय नागरिकांनो, या देशाच्या रहिवाशांनो, आजच्या प्रकारानं देशाच्या राजकारणाची लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जो काही प्रकार झाला आहे त्याला काय म्हणावे असा प्रश्न आहे. अतिशय हिणकस आणि किळसवाण्या गोष्टीनं मनाला खूप वेदना झाल्या आहेत.

राजकीय क्षेत्र किती वेगळ्या थराला गेले आहे हे दिसून आले आहे. आणि आपण अजनुही शांत बसणार असाल तर ते वेळ गेलेली नाही. देशासाठी बोलण्याची वेळ आली आहे. अशा शब्दांत प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.