'त्या' निर्णयाला मोदींच्या बंधूंचा विरोध

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

अहमदाबाद : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सार्वजनिक वितरण करणाऱ्या दुकानांमध्ये डेबिट कार्डने पैसे अदा करण्यासाठी स्वाइप मशीन लावण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि गुजरात स्वस्त धान्य दुकान संघाचे अध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रल्हाद मोदी म्हणाले, "स्वस्त धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर स्वाइप मशीन लावण्यासाठी दबाव टाकण्यात येऊ नये. स्वाइप मशीनची किंमत पंचवीस हजार रुपये आहे. त्याशिवाय दरमहा काही रक्कम द्यावी लागते.' स्वस्त धान्य दुकाने बायोमेट्रिक पद्धतीने जोडण्यासाठी संगणक सामुग्रीसह अन्य काही उपकरण खरेदीचा खर्च दुकानदारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी खर्द लादणे, योग्य नसल्याचेही प्रल्हाद मोदी यांनी सांगितले आहे.

'सरकारला रोखरहित (कॅशलेस) अर्थव्यवस्था हवी आहे. मात्र, सरकारला हे समजायला हवे की जे लोक स्वस्त धान्य दुकानात खरेदीसाठी येतात त्यांच्यापैकी बहुतेकांकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसते', असेही ते पुढे म्हणाले. अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकान संघाचे उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहणारे प्रल्हाद मोदी यांनी यापूर्वीही त्यांनी मोदी सरकार आणि गुजरात सरकारच्या काही निर्णयांना विरोध केला होता.

Web Title: Pralhad Modi's objection for Modis decision