प्रणबदा संघानंतर भाजपच्या व्यासपीठावर

Pranab Mukherjee attended program by BJP in Hariyana
Pranab Mukherjee attended program by BJP in Hariyana

दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही होते. प्रणब मुखर्जी आणि मनोहरलाल खट्टर यांनी हरचंदपुर आणि नयागाव मधील स्मार्ट ग्राम योजनेच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.

प्रणब मुखर्जी राष्ट्रपती असताना त्यांनी स्मार्टग्राम योजने अंतर्गत गुरूग्राम मधील सोहना ब्लॉक मध्ये येणारे हरचंदपुर हे गाव दत्तक घेतले होते. त्यावेळी मुखर्जी यांनी 2 जून 2017 ला या गावाचा दौरा केला होता. त्यानंतर गावात विकासकामे सुरू झाली. या गावाला आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील ग्राम सचिवालयात वाइ-फाय पासून डिजीटल स्क्रीनपर्यंतच्या सुविधा मिळणार आहेत.

मागील काही दिवसांपासून हरियाणामध्ये 'प्रणब मुखर्जी फाउंडेशन' आरएसएस सोबत मिळून काम करणार आहे. अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी मुखर्जी यांच्या कार्यालयातून अशी कसलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 

यापुर्वी प्रणब मुखर्जी यांनी नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे प्रमुख असणारे मुखर्जी यांनी राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती यावर आपले विचार मांडले होते. मुखर्जी यांनी आरएसएस च्या कार्यक्रमात लावलेल्या हजेरीमुळे अनेक वाद निर्माण झाले होते. त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com