...तर प्रणव मुखर्जी असतील पंतप्रधानपदाचे उमेदवार : शिवसेना

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाहीतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे''. 

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूर मुख्यालयातील आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थिती लावली. त्यानंतर आज शिवसेनेने सांगितले, की ''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाहीतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे''. 

नागूपर येथील आरएसएसच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी हजेरी लावली. मात्र, त्यापूर्वी काँग्रेससह इतर पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर आज शिवसेनेने आरएसएसवर निशाणा साधताना सांगितले, की आरएसएसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीही व्यासपीठावर आमंत्रित केले नाही. मात्र, इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न आता त्यांच्याकडून केला जात आहे. 

दरम्यान, आरएसएसच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्यावर टीका होऊ नये, यासाठी प्रणव मुखर्जींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे सांगितले होते. 

Web Title: Pranab Mukherjee could be consensus PM candidate if BJP lacks majority in 2019 says Shiv Sena