'प्रसार भारती'चे CEO देणार राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - ‘प्रसार भारती‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार मुदतपूर्व राजीनाम्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली - ‘प्रसार भारती‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार मुदतपूर्व राजीनाम्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.

सिरकार हे पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. मात्र मुदतपूर्व सेवा संपविण्याचा त्यांचा विचार आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळविले आहे. या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला. मात्र यासंदर्भात सिरकार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दूरदर्शनच्या स्लॉटसची विक्री प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीच्या आसपास सिरकार पदावरून दूर होणार असल्याची माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने 2012 साली त्यांची सीईओपदी नियुक्ती केली होती. त्यापूर्वी त्यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव पदाची जबाबदारी होती.

Web Title: Prasar Bharati CEO Jawhar Sircar resigns