Mon, Sept 25, 2023

New Director Of CBI: सीबीआयच्या संचालक पदी प्रवीण सूद यांची नियुक्ती
Published on : 14 May 2023, 10:52 am
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सूद २५ मे रोजी पदभार स्वीकारतील. डीजीपी सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
डीजीपी प्रवीण सूद मार्चमध्ये चर्चेत आले होते. जेव्हा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी.के शिवकुमार यांनी त्यांच्यावर कर्नाटक मधील भाजप सरकारला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. तसेच सूद काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप करत राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अटकेची मागणी केली होती.