तोगडियांनी केली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवीन संघटनेची स्थापना केली आहे. आज अहमदाबादमध्ये त्यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. 'आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद' असे या संघटनेचे नाव आहे. तोगडिया या संघटनेचे प्रमुख असतील.​

अहमदाबाद: विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवीन संघटनेची स्थापना केली आहे. आज अहमदाबादमध्ये त्यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. 'आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद' असे या संघटनेचे नाव आहे. तोगडिया या संघटनेचे प्रमुख असतील.

यावेळी, तोगडिया समर्थकांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर 'हिंदू ही आगे' असं लिहिलं होतं. तसंच व्यासपीठावर भारत माता, गो-माता, गणपती आणि अशोक सिंघल यांची प्रतिमा ठेवलेल्या होत्या. 'लोक नवीन असले तरी तोच आक्रमकपणा कायम राहील', असे तोगडिया यांनी यावेळी सांगितले.

14 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासून तोगडिया नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. प्रसंगी त्यांनी भाजपच्या नेतृत्त्वावरही टीका केली होती. यावर्षीच एप्रिलमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल विष्णू सदाशिव कोकजे हे संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले. कोकजे यांनी तोगडियांचे समर्थक मानले जाणारे राघव रेड्डी यांचा पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जाणारे तोगडिया हे काही दिवसांपासून मोदींनाच लक्ष्य करत होते. मोदींनी सत्तेत आल्यानंतर आश्वासनं पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी मोदीवर केला होता. 

Web Title: Pravin Togadia Launched international hindu parishad