राज्यात होणार मुदतपूर्व निवडणुका

राज्यात होणार मुदतपूर्व निवडणुका

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटक राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असे आज (शुक्रवार) स्पष्ट संकेत दिले. तसेच आपण काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते, असेही ते म्हणाले. 

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेगौडा यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेगौडा म्हणाले, कर्नाटक राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, यामध्ये काही शंका नाही. काँग्रेसने आम्हाला पाच वर्षे समर्थन देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांची वागणूक योग्य नाही.  

दरम्यान, कर्नाटकात सध्या जेडीएस आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी हे वक्तव्य केले. 

खर्गेंना मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते

राज्यात काँग्रेस-जेडीएसचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपण काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी एचडी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com