कोरोना सर्दीसारखा किरकोळ होणार;वैद्यकीय संशोधकांचा अंदाज

वृत्तसंस्था
Thursday, 14 January 2021

सर्वसाधारणपणे सर्दीसाठी कोरोनाचे जे चार विषाणू कारणीभूत असतात त्यांचा संशोधकांनी बारकाईने अभ्यास केला असून यामध्ये सार्सच्या विषाणूंचाही समावेश होता. 

नवी दिल्ली - सध्या जगभर कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग अधिक असला तरीसुद्धा भविष्यामध्ये मात्र त्याला ब्रेक लागणार असून त्याचे स्वरूप हे किरकोळ सर्दीसारखे होऊ शकते, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

बाल्यावस्थेमध्ये जशी सर्वांना सर्दी होते तशाच पद्धतीने सर्वांना कोरोनाचा संसर्ग होईल असे त्यांचे म्हणणे आहे. ‘जर्नल सायन्स’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले. सर्वसाधारणपणे सर्दीसाठी कोरोनाचे जे चार विषाणू कारणीभूत असतात त्यांचा संशोधकांनी बारकाईने अभ्यास केला असून यामध्ये सार्सच्या विषाणूंचाही समावेश होता. 

हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष

जेव्हा सगळ्याच लोकसंख्येला कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ लागते तेव्हा त्याची तीव्रता देखील कमी होत जाते असे संशोधकांचे म्हणणे आहे. संसर्गाच्या प्रसारामध्ये नेमका कशा पद्धतीने बदल होत जातो या अंदाज वर्तविणारा आराखडा शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. 

सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाच्या चार विषाणूंचा माणसाला फार पूर्वीपासून संसर्ग होत आला आहे. बाल्यावस्थेमध्ये सर्वांनाच त्याचा संसर्ग होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस

प्रतिकार शक्ती महत्त्वाची
लहानपणी होणाऱ्या नैसर्गिक संसर्गामुळे पुढे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढते. याच बळावर आजारांचा सामना करणे शक्य होते पण कालांतराने संसर्गापासून व्यक्तीचे संरक्षण होत नसल्याचे आढळून आले आहे, असे संशोधक जेन्नी लॅव्हिने यांनी सांगितले. शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे तशाच गोष्टी घडून येण्यासाठी संसर्गाचा वेग व  रोगप्रतिकार शक्ती हे दोन घटक महत्त्वपूर्ण आहेत.

हे वाचा -मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ते कर्नाटकातला भ्रष्ट कारभार; देशविदेशातील घडामोडी एका क्लिकवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: predictions of medical researchers Coronavirus will be as minor as a cold

Tags
टॉपिकस
Topic Tags: