जेईई ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्यांना पसंतीची केंद्रे;येत्या रविवारी परीक्षा 

जेईई ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्यांना पसंतीची केंद्रे;येत्या रविवारी परीक्षा 

नवी दिल्ली - येत्या २७ सप्टेंबर रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीतीच परीक्षा केंद्र देण्यात आली आहे. ही केंद्र त्यांनी भरलेल्या अर्जातील पहिल्या तीन पर्यायातीलच आहेत, अशी माहिती आज आयआयटी दिल्लीने दिली.आयआयटी दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी करणारे आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या एकुण उमेदवारांपैकी ९७.९४ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पर्यायातीलच पसंतीचीच परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिली आहेत. उर्वरित २.०६ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या आठ पर्यायातील पसंतीची परीक्षा केंद्र प्रदान करण्यात आले.

परीक्षा केंद्र असणाऱ्या शहरांची निवड ॲडव्हान्स्ड ॲल्गोरिदमच्या आधारावर करण्यात आली आले. अल्गोरिदमध्ये कोविड-१९ ची स्थिती आणि परीक्षा केंद्रातील सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. गेल्यावर्षी ६०० केंद्र होते तर यंदा १००० केंद्र स्थापन करण्यात आले. तसेच परीक्षा केंद्र असणाऱ्या शहरांची संख्या देखील १६४ हून २२२ केली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेईई ॲडव्हान्स २०२० साठी पात्र विद्यार्थ्यांपैकी केवळ ६४ टक्के विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. जेईई मेन परीक्षेतील आघाडीचे २.४५ लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेला पात्र असतात. मात्र यावर्षी केवळ १.६० लाख विद्यार्थ्यांनीच जेईई ॲडव्हान्ससाठी नोंदणी केली आहे. आयआयटी दिल्लीकडून देशभरातील २३ आयआयटीच्या १,१००० पेक्षा अधिक जागांसाठी परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी ८.५८ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्ससाठी अर्ज केला होता. त्यापैकी २.५ लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्डला पात्र ठरले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेईई ॲडव्हान्ससाठी मार्गदर्शक सूचना 
मोठ्या बटणाच्या कपड्यांचा पेहराव करु नये 
साखळी, अंगठी, ब्रेसलेट, इअररिंग्ज, पेडेंट, हेअरपीन, हेअर बँड, तावीज घालण्यास मनाई 
स्मार्ट किंवा डिजिटल घड्याळ, मोबाईल फोन, ब्लूटूथ डिव्हाइस, इअरफोन, पेजर, हेल्थ बँडसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट बाळगण्यास मज्जाव 
रफ कामासाठी रायटिंग पॅड देणार 
मास्क घालणे बंधनकारक 
परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ठराविक अंतराने येणे गरजेचे 
रिपोर्टिंग टाइमची माहिती एसएमएसवर मिळणार 
नऊच्या पेपरसाठी ७ वाजल्यापासून रिपोर्टिंग 
परीक्षा सुरू होण्यापूर्वी २५ मिनिटे अगोदर विद्यार्थी संगणकावर लॉग इन करुन सूचना वाचू शकतील 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com