संतापजनक! गर्भवती महिलेवर 12 तासांपर्यंत बलात्कार; प्रियकराची आत्महत्या

crime
crime

जयपूर : राजस्थानमधील बांसवाडा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून, एका गर्भवती महिलेवर तब्बल 12 तासांपर्यंत सामूहिक बलात्कार करण्यात आला. या दु:ख सहन न झाल्याने पीडित महिलेच्या प्रियकराने आत्महत्येचे पाऊल उचलले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रभू आहे. प्रभू आणि या माहिलेचे लग्नही ठरले होते. या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर चौकशी केली असतान हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 13 जुलैला प्रभू त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत बाहेर फिरायला गेला होता. यादरम्यान त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर हे आरोपी प्रभू आणि पीडितेला एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. इथे दोन तरुण आधीच उपस्थित होते. यावेळी प्रभूला जबर मारहाण करण्यात आली. तर पीडितेवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी या दोघांनाही रस्त्याच्या कडेला फेकलं आणि तिथून पळ ठोकला.

यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे ती आधीच गर्भवती असल्याचे समोर आले. तिच्यासोबत झालेला बलात्कार आणि मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला होता. इतक होऊनही प्रभूने पोलिसांत तक्रार केली नाही, तर त्याने पीडितेची समजूत काढत तिला घरी नेले. पण, झालेल्या प्रसंगाने तो हेलावून गेला होता. त्याला हे दु:ख सहन झाले नाही आणि अखेर त्याने स्वत:चे जीवन संपविले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com