...म्हणून नवऱयाची किस करताना तोडली जीभ

वृत्तसंस्था
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

आपला नवरा हा दिसायला सावळा आहे. तो चांगला दिसत नसल्याच्या कारणावरुन किस करताना पतीच्या जीभेचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील रनहोला या ठिकाणी घडला आहे. या जोडप्यामध्ये सातत्याने भांडणे व्हायची, त्यामुळे तिने असे केल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली- आपला नवरा हा दिसायला सावळा आहे. तो चांगला दिसत नसल्याच्या कारणावरुन किस करताना पतीच्या जीभेचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील रनहोला या ठिकाणी घडला आहे. या जोडप्यामध्ये सातत्याने भांडणे व्हायची, त्यामुळे तिने असे केल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पत्नीने मात्र, आपला नवरा चांगला दिसत नाही म्हणून संतापाच्या भरात आपण त्याची जीभ तोडल्याचे या महिलेने पोलिसांकडे स्पष्ट केले आहे. दिल्लीतील रहनोला भागात राहणारे या जोडप्याचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले. मात्र काही दिवसांनी दोघांमधले भांडण मिटले आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र या घटनेनंतर या महिलेचा पती बोलू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

या प्रकरणी महिलेच्या सासऱ्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नवरा सावळा असल्याच्या रागातूनच तिने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. ही महिला आठ महिन्यांची गरोदर असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या दोघांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते.

Web Title: Pregnant Delhi Woman Bites Off Husbands Tongue Allegedly Over His Looks