गर्भवती महिलेची रेल्वेत केली हत्या

गर्भवती महिलेची रेल्वेत केली हत्या

शाहजाहनपूर (उत्तर प्रदेश) : सहप्रवाशांना रेल्वेमध्ये धूम्रपानास विरोध करणाऱ्या एका गर्भवती महिला प्रवाशाची हत्या करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे पोलिसांनी सांगितली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्या वेळी चिनात देवी (वय 45) ही महिला आपल्या कुटुंबासह पंजाब-बिहार जालियनवाला एक्‍स्प्रेसमधून प्रवास करीत होती. त्या वेळी अन्य प्रवासी असलेला सोनू यादव हा धूम्रपान करीत होता. त्याला चिनात देवी यांनी हरकत घेतली, असे रेल्वे पोलिसचे स्थानक प्रमुख ए. के. पांडे यांनी सांगितले. 

त्या वेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यादवने त्या वेळी गर्भवती महिलेवर हल्ला करीत तिचा गळा दाबला, असे सांगत पांडे म्हणाले, की जेव्हा रेल्वे शाहजानपूर स्थानकात थांबली तेव्हा पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. छट पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी मृत गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीय बिहारला चालले होते, असे पांडे यांनी स्पष्ट केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com