गर्भवती मातांनी मांस खाऊ नये

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली - गर्भवती महिलांबाबत "आयुष' मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या पुस्तिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. सुदृढ बाळासाठी गर्भवती महिलाने सेक्‍स, राग, मांस आणि वाईट सवयींपासून दूर राहावे, असे यात नमूद करण्यात आले आहे. 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

गर्भवती मातेने पोषक आहार घेत आध्यात्मिक विचार करावा, महान नेत्यांच्या यशोगाथा वाचाव्यात, तसेच शयनकक्षामध्ये सुंदर बालकांची चित्रे लावावीत याचा बाळावर परिणाम होतो, असा दावाही या पुस्तिकेमध्ये करण्यात आला आहे. योग आणि निसर्गोपचारविषयक केंद्रीय परिषदेने ही पुस्तिका तयार केली आहे. देशातील नामांकित प्रसूतीतज्ज्ञांनी "आयुष' मंत्रालयाचा दावा अवैज्ञानिक स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. सर्वसाधारणपणे गर्भवती मातांमध्ये प्रथिनांची कमतरता, कुपोषण आणि ऍनेमिया या आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने आढळून येतात. अशा महिलांसाठी मांस हे प्रथिने आणि लोह यांचा मोठा स्रोत असतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Web Title: pregnant women marathi news don't eat nonveg ayush book