लष्कराकडून "विजय दिना'ची तयारी

पीटीआय
शनिवार, 21 जुलै 2018

श्रीनगर : पाकिस्तानला 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये भारताने चारीमुंड्या चित केले होते, या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 आणि 26 जुलै रोजी " कारगिल विजय दिन' साजरा केला जातो. या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

नेहमीप्रमाणे यंदाही हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे, याची सुरवात द्रास या सीमावर्ती भागात वसलेल्या शहरातील कारगिल युद्ध स्मारकाला अभिवादन करून करण्यात येईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ते राजेश कालिया यांनी दिली. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणांवर कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. 

मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद 

इम्फाळ : चिथावणीखोर संदेशांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने अनेक भागांतील मोबाईल इंटनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पाच दिवसांसाठी येथील इंटरनेट सेवेचे शटरडाऊन असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

विशेष गृहसचिव के. एच. रघुमणी यांनी शुक्रवारी यासदंर्भात आदेश जारी केले. मणिपूरमध्ये जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली असून, त्याला सोशल मीडियातील चिथावणीखोर संदेश कारणीभूत ठरू लागले आहेत. 

Web Title: Preparation of Vijay Din from the Army