ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे सरकारचे लक्ष्य : राष्ट्रपती

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज (गुरुवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेंट्रल हॉलमध्ये अभिभाषण झाले. या अभिभाषणात त्यांनी सरकारच्या योजनांविषयी माहिती दिली. तसेच नवनियुक्त खासदारांचे अभिनंदन केले. 

नवी दिल्ली : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हेच सरकारचे लक्ष्य असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज (गुरुवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेंट्रल हॉलमध्ये अभिभाषण झाले. या अभिभाषणात त्यांनी सरकारच्या योजनांविषयी माहिती दिली. तसेच नवनियुक्त खासदारांचे अभिनंदन केले. 

राष्ट्रपती म्हणाले - 
- यंदा लोकसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांचे मतदान सर्वाधिक
- यावेळी सर्वाधिक 78 महिला खासदार संसदेत आल्या
- विकासयात्रेला गतीने वाढविण्यासाठी देशाने आपले मत दिले आहे
- सबका साथ सबका विकास या मुल्यावरच संसदेचे कामकाज
- अस्थिरता आणि निराशेच्या वातावरणातून देश बाहेर आला आहे.
- देशाला सशक्त करणे हेच सरकारचे मुख्य कर्तव्य आहे
- देशवासियांचे जीवन सुखकर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु
- लोकांना सजग, सशक्य आणि बंधनमुक्त करण्यासाठी प्रय़त्न
- सरकारने नागरिकांना मूलभूत सोईसुविधा दिल्या
- शेतकरी, जवान, उद्योग, महिला यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले
- देशातील प्रत्येक व्यक्तीला सशक्त बनविण्याचे आमचे ध्येय
- शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करण्यात आली
- छोट्या व्यावसायिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरु करण्यात आली
- जवानांच्या मुलांसाठी स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्यात आली.
- सशक्त आणि सुरक्षित सर्वसमावेशक भारत करण्यासाठी प्रयत्न सुरु
- नवीन भारतात युवकांची स्वप्न पूर्ण होतील
- जलसंरक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी गरजेचे असून, त्यासाठी जल मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे
- ग्रामीण भारताला मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
- ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे सरकारचे लक्ष्य
- नवीन भारतात ग्रामीण भारत सशक्त असेल
- 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न सुरु
- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 10 हजार नवे शेतकरी उत्पादन संघ सुरु करणार
- कृषी क्षेत्रात 25 लाख कोटींची नव्याने गुंतवणूक
- मत्स व्यवसायासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येईल
- जनधऩ योजना यशस्वी झाल्यानंतर बँकींग क्षेत्रात विकास योजना आणण्यात येत आहे
- 50 कोटी नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली
- या योजनेंतर्गत 25 लाख रुग्णांवर उपचार 
- महिला सशक्तीकरण हे सरकारचे मुख्य ध्येय आहे
- गावांमध्ये दोन कोटी नवी घरे उभारण्याचे सरकारचे लक्ष्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ram Nath Kovind address at the Parliament