सात जणांना जीवंत जाळणाऱ्या दोषीला फाशी होणार

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

म्हैस चोरीच्या खटल्यावरून एकाच कुटुंबातील सात जणांना जीवंत जाळल्याप्रकरणी फाशीच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या दोषीची दया याचिका आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. राष्ट्रपतिपद सांभाळल्यानंतर कोविंद यांच्याकडे दाखल झालेली ही पहिलीच दया याचिका होय. ही याचिका फेटाळल्याने दोषींची फाशीची शिक्षा कायम राहिली आहे. 

नवी दिल्ली : म्हैस चोरीच्या खटल्यावरून एकाच कुटुंबातील सात जणांना जीवंत जाळल्याप्रकरणी फाशीच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या दोषीची दया याचिका आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. राष्ट्रपतिपद सांभाळल्यानंतर कोविंद यांच्याकडे दाखल झालेली ही पहिलीच दया याचिका होय. ही याचिका फेटाळल्याने दोषींची फाशीची शिक्षा कायम राहिली आहे. 

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर ब्लॉक येथे 2006 रोजी खळबळजनक घटना घडली होती. विजेंद्र महातो यांनी सप्टेंबर 2005 रोजी म्हैस चोरीचे प्रकरण पोलिसांकडे दाखल केले होते. या प्रकरणात जगत राय याच्याशिवाय वजीर राय आणि अजय राय आरोपी होते. परंतु हे आरोपी (आताचे दोषी) महातो याच्यावर खटला मागे घेण्याचा दबाव टाकत होते. यावरून महातो आणि जगत राय यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र जगत रायने महातोचे घर पेटवले आणि त्यात महातोची पत्नी आणि पाच मुलांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत गंभीर जखमी झालेले महातो यांचे काही महिन्यांनंतर निधन झाले. याप्रकरणी जगत रायला दोषी ठरवून कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर जगतरायने राष्ट्रपती भवनकडे दया याचिका पाठविली होती. यावर राष्ट्रपती कार्यालयाने गृहमंत्रालयाचे मत मागवले हाते. राष्ट्रपती भवनने दिलेल्या निवेदनात म्हटले, की राष्ट्रपतींनी जगत रायची दया याचिका 23 एप्रिल 2018 रोजी फेटाळून लावली आहे. 

Web Title: President Ram Nath Kovind Rejects First Mercy Plea Of Man Who Burnt 7 People Alive