सियाचीन तळाला राष्ट्रपतींची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 मे 2018

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्कराच्या सर्वांत उंच अशा बर्फाच्छादित सियाचीन येथील तळाला आज भेट देऊन जवानांचे कौतुक केले. राष्ट्रपती कोविंद यांचा सियाचीनचा हा पहिलाच दौरा असून, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर येथील लष्करी तळाला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत. या भेटीत जवानांशी संवाद साधताना कोविंद यांनी जवानांना राष्ट्रपती भवनात येण्याचे आमंत्रण दिले. 

सियाचीन (जम्मू- काश्‍मीर) - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्कराच्या सर्वांत उंच अशा बर्फाच्छादित सियाचीन येथील तळाला आज भेट देऊन जवानांचे कौतुक केले. राष्ट्रपती कोविंद यांचा सियाचीनचा हा पहिलाच दौरा असून, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर येथील लष्करी तळाला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत. या भेटीत जवानांशी संवाद साधताना कोविंद यांनी जवानांना राष्ट्रपती भवनात येण्याचे आमंत्रण दिले. 

कोविंद म्हणाले, ""माणसाला जगणे अवघड असलेल्या जगातील सर्वांत उंच आणि बर्फाच्छादित वातावरणाच्या युद्धक्षेत्रात राहून हवामानाचा हल्ला सहन करत देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी शत्रूशी लढण्यास सदैव तत्पर राहणे अवघड आहे. अशा बहादूर जवानांशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. युद्धात वीरमरण आलेल्या जवानांची आवर्जून आठवण काढत कोविंद म्हणाले, ""प्रत्येक भारतीय कुटुंब आपल्या बरोबर आहे. त्यांच्या सुरक्षेचे काम प्रत्येक भारतीय करत आहे.'' 

Web Title: President Ram Nath Kovind to visit Siachen camp