जन्मभूमीवर उतरताच राष्ट्रपती झाले नतमस्तक

जन्मभूमीवर उतरताच राष्ट्रपती झाले नतमस्तक

कानपूर देहात, (उत्तर प्रदेश) - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतर आज प्रथमच आपल्या मूळ गावाला भेट दिली. कानपूर देहात जिल्ह्यातील परौंख या गावी उतरताच पहिल्यांदा भूमीला वंदन केले. पत्नी सवितादेवी यांच्यासोबत राष्ट्रपती कोविंद एका विशेष रेल्वेगाडीने कानपूर येथे आले. तेथून ते हेलिकॉप्टरने आपल्या गावी गेले. तेथे त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी स्वागत केले. गावात उतरल्यानंतर लगेचच त्यांनी जन्मभूमीला वंदन केले, भूमीला वंदन करतानाचे छायाचित्र राष्ट्रपती भवनाने प्रसिद्ध केले आहे.

गावात आयोजित केलेल्या ‘जन अभिनंदन समारोह’मध्ये बोलताना राष्ट्रपतींनी आपल्या आयुष्यातील गावाचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे विशद केले. ते म्हणाले, ‘‘मी जिथे कुठे जाईन तिथे माझ्यासोबत माझ्या गावच्या मातीचा सुगंध आणि गावकऱ्यांच्या आठवणी कायम असतील. माझ्यासाठी परौंख फक्त एक गाव नाही तर माझी मातृभूमी आहे. तिच्याकडून मला कायम पुढे जात राहण्याची आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते.’’

जन्मभूमीवर उतरताच राष्ट्रपती झाले नतमस्तक
‘डेल्टा प्लस’मुळे फुप्फुसांना अधिक संसर्गाची शक्यता

ते म्हणाले, ‘‘ माझ्या सारखा गावातील एक सामान्य मुलगा संपूर्ण देशाची जबाबदारी घेईल, त्याला देशातील सर्वोच्च स्थान मिळेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. पण आपल्या लोकशाहीने हे करून दाखवले.’’

भारतीय संस्कृतीतील, मातृ देवो भव, पितृ देवो भव आणि आचार्य देवो भव, याचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले, ‘‘गावातील नागरिक आपल्या पालकांचा आणि गुरुजनांचा सन्मान करत असल्याचे पाहून समाधान वाटले. गावातील सर्वांत ज्येष्ठ महिलेला मातेचा दर्जा देण्याची माझ्या कुटुंबाची पद्धत होती. आमच्या कुटुंबाची ही प्रथा अजूनही गावात जपली जात असल्याचे पाहून आनंद वाटला.

जन्मभूमीवर उतरताच राष्ट्रपती झाले नतमस्तक
मी आणि आईने लसीचे दोन्ही डोस घेतले; तुम्हीही घ्या - PM मोदी

सर्वांनी लस घ्या!

गावकऱ्यांनी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले. लसीमुळे आपले आयुष्य सुरक्षित होईल, असे ते म्हणाले. राष्ट्रपती अजून एक दिवस दौऱ्यावर असून ता. २९ रोजी ते विशेष विमानाने दिल्लीला परततील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com