WFH मुळे महिलांवर तिप्पट भार, राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

president
presidentesakal

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम (WFH) वर आपले मत मांडताना सांगितले की, याचे एकीकडे फायदे आहेत, तर दुसरीकडे नोकरदार महिलांसाठी हे तिप्पट ओझे बनले आहे. आणखी काय म्हणाले राष्ट्रपती?

ईयरबूकमध्ये राष्ट्रपतींनी तरुणांना लिहिले पत्र

"अराइज, द फ्यूचर बेकोन्स" या शीर्षकाखाली लिहलेल्या पत्रात राष्ट्रपती म्हणतात, घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना महिला आधीच दुहेरी भार सहन करत आहेत. मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी दोघांवर असते, पण इथे शिकवण्याची जबाबदारीही मातांवर टाकली जाते. अशा परिस्थितीत पुरुषांनी कुटुंबातील जबाबदारी वाटून घेतली पाहिजे.

president
प्रजासत्ताक दिनी रिक्षा चालक, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आमंत्रण; खास असणार सोहळा

महामारीने सर्वांना शिकवले

राष्ट्रपती म्हणाले की, साथीच्या रोगाने आपल्या सर्वांना हे शिकवले आहे की, हवामान बदलामुळे होणारे बदल कसे नियंत्रित केले पाहिजे. साथीचे रोग हे एक अनिश्चित संकट आहे पण त्याहून मोठ्या संकटाला कसे तोंड द्यायचे याचाही तो आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे. हवामान बदल हा आता वैज्ञानिक संशोधनाचा आणि धोरणात्मक चर्चेचा विषय राहिलेला नाही, परंतु त्याचा परिणाम नेहमीच वास्तविक राहिला आहे.

president
राज्यात 93 नगरपंचायतींमध्ये उधळणार विजयाचा गुलाल, मतमोजणीला सुरुवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com