अमली पदार्थांच्या चोरट्या वाहतुकीचा धोका - राष्ट्रपती 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

दहशतवादाबरोबरच अमली पदार्थांची चोरटी वाहतूक व व्यसनाधीतेचा वाढता धोका यामुळे देशातील सीमेवर अस्थिर वातावरण व तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे पंजाब व मणीपूरसारख्या राज्यांत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी सांगितले. 
 

नवी दिल्ली - दहशतवादाबरोबरच अमली पदार्थांची चोरटी वाहतूक व व्यसनाधीतेचा वाढता धोका यामुळे देशातील सीमेवर अस्थिर वातावरण व तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे पंजाब व मणीपूरसारख्या राज्यांत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूकविरोधी दिनानिमित्त मद्यपान प्रतिबंध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ते म्हणाले,"" म्यानमार-लाओस- थायलंडमधील सुवर्ण त्रिकोण आणि इराण-अफगणिस्तान-पाकिस्तानमधील "सुवर्ण चंद्रकोर' यामधील भारताचे भौगोलिक स्थान पाहता तेथे व्यसनाधीनता व अमली पदार्थांची चोरटी वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर व गुंतागुंतीचा आहे. या प्रश्‍नाबरोबरच दहशतवाद, राजकीय अस्थिरता या समस्याही मोठ्या आहेत. म्हणूनच पंजाब, मणीपूरसारख्या राज्यांमध्ये अधिक दक्षता बाळगणे आवशयक आहे. 

Web Title: president ramnath kovind statement on Risk of drugs supply