आमदार बंगालला पाठवा - ममता बॅनर्जी

ममता : पूरग्रस्त आसामच्या सरकारला त्रास नकों
presidential election Assam faces flood crisis Mamata Banerjee Send MLA to Bengal
presidential election Assam faces flood crisis Mamata Banerjee Send MLA to Bengalsakal

कोलकाता - आसामचे राज्य पुराच्या संकटाचा सामना करीत असताना तुम्ही येथील सरकारला का त्रास देत आहात, असा सवाल करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आमदारांना बंगालला पाठवावे असे आवाहन केले. आपण त्यांचे उत्तम आदरातिथ्य करूच आणि लोकशाहीचेही संरक्षण करू, असा टोलाही त्यांनी लगावला. त्या पुढे म्हणाल्या की, हा सारा खेळ राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठीच आहे. मात्र हे नितीमूल्यांना धरून नाही तसेच घटनाबाह्य पद्धतीने सुरु आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या विरोधी नेत्यांना केंद्रीय संस्था गजाआड करतात. तृणमूलच्या दोनशेपेक्षा जास्त सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही अशाच आशयाची टिप्पणी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी पुरग्रस्तांची जास्त काळजी करावी आणि महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची कमी फिकीर करावी, पण रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या सरकारचा प्राधान्यक्रम उघड आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बंगाल भाजपचे प्रत्यूत्तर

भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ही टीका फेटाळून लावली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील उलथापालथ शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे झाली आहे. भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तृणमूल पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आम्हाला राजकारणाच्या नितीमूल्यांबाबत व्याख्यान देऊ नये. ते नैतिकता किती बाळगतात हे साऱ्या देशाला ठाऊक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com