राष्ट्रपतिपदाचा फैसला आज : रामनाथ कोविंद विरुद्ध मीरा कुमार

पीटीआय
सोमवार, 17 जुलै 2017

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाची आज निवडणूक होत असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी 'एनडीए'चे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होत आहे. मीरा कुमार यांना 17 विरोधी पक्षाचे समर्थन मिळालेले असले तरी, प्रारंभिक पातळीवर मतांच्या आकडेवारीत रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा त्या पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी येत्या 21 जुलैला होणार आहे.

आकडेवारीच्या आधारावर रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होणे जवळपास निश्‍चित झाले आहे. बिहारचे माजी राज्यपाल कोविंद आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांनी मतांसाठी राज्यांचे दौरे केले आहेत. राष्ट्रपतींची निवड इलेक्‍ट्रोरल कॉलेजचे सदस्य करत असतात. संसंदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि राज्यांच्या विधिमंडळाचे सदस्य (दिल्ली एनसीआर, पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशसहित) यांचा समावेश आहे. संसद आणि राज्य विधिमंडळातील नामनिर्देशित सदस्यांचा इलेक्‍ट्रोरल कॉलेजमध्ये समावेश नसतो.

एकूण 4 हजार 896 मतदार असून, त्यात 4120 आमदार आणि 776 खासदारांचा समावेश आहे. सध्या तेरा जागा रिक्त असून, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर भरण्यात येणार आहेत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 5,37,683 मते असून, त्यात शिवसेनेच्या मतांचा समावेश आहे. यात आणखी 12 हजार मतांची गरज आहे; परंतु बिजूद, टीआरएस, वायएसआर कॉंग्रेस आणि अण्णा द्रमुकच्या लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिल्यास मतांची उणीव भरून निघेल.

दृष्टिक्षेपात निवडणूक
एकूण मतदान केंद्र : 32 (संसद भवन आणि प्रत्येक राज्यातील विधानसभा)
एकूण निरीक्षक : 33 ( दोन संसद भवन येथे, तर प्रत्येक राज्यातील एक विधानसभा)
स्वत:चा पेन वापरण्यास मनाई : निवडणूक आयोगाने खासदार आणि विधिमंडळाच्या आमदारांना मतदान केंद्रात स्वत:चा पेन नेण्यास मनाई केली आहे. निवडणुकीसाठी खास मार्कर पेन मतदानाच्या वेळी वापरणे बंधनकारक केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
शंभर टक्‍के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री
ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...!​
द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा​
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण​
फेडररचे विक्रमी विजेतेपद​
भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी​
काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर​
‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’​

Web Title: presidential elections poll ram nath kovind meira kumar