'किती गाझी आले अन् किती गाझी गेले'

gaazi
gaazi

श्रीनगर : काश्मीरमध्ये आतापर्यंत किती गाझी आले अन् किती गाझी गेले. या सर्वांचा खातमा लष्कराने केला आहे. त्यामुळे तरुण दहशतवाद्यांनी बंदुका सोडून आत्मसमर्पण करावे, असे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन यांनी म्हटले आहे.

धिल्लन म्हणाले, की तरुण दहशतवाद्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडावा. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय रसद पुरवत आहे. पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेला या हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशिद गाझी ऊर्फ कामरान याच्यासह दोघांना 100 तासांत ठार केले. काश्मिरात घुसखोरी करणाऱ्यांना जिवंत सोडणार नाही.

पुलवामा हल्ल्याचा घाव बसलेल्या भारतीय जवानांनी सोमवारी या हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशिद गाझी ऊर्फ कामरान याला चकमकीत ठार केले. पुलवामामध्येच झालेल्या या चकमकीत लष्करातील एका मेजरसह चार जवानांनाही हौतात्म्य आले. यानंतर आज लष्कराने पत्रकार परिषद घेत या हल्ल्याबाबत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com