सर्वसामान्यांना पुन्हा दणका; CNG आणि PNG च्या दरांमध्ये वाढ; जाणून घ्या काय आहेत भाव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

सोमवारीच घरगुती गॅस म्हणजेच LPG च्या दरांमध्ये प्रति सिलेंडर 25 रुपयांची वाढ झाली होती.

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये CNG आणि PNG च्या दरांमध्ये वाढ झाली आहे. सीएनजी गॅसच्या दरांमध्ये 70 पैसे प्रति किलोग्रॅम तर पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) मध्ये 91 पैशांची वाढ केली गेली आहे. हे नवे दर आज मंगळवार सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत आहेत. याबाबत माहिती देताना इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने आपल्या वक्तव्यात म्हटलंय की दिल्लीमध्ये आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमत 43.40 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर नोएडा, गाझीयाबादमध्ये 49.08 प्रति किलोग्रॅमच्या दराने CNG मिळेल. दिल्लीमध्ये आता PNG ची नवी किंमत 28.41 रुपये प्रति एससीएम असेल.  

सोमवारीच घरगुती गॅस म्हणजेच LPG च्या दरांमध्ये प्रति सिलेंडर 25 रुपयांची वाढ झाली होती. या एकाच महिन्यात घरगुती गॅसचे दर चारवेळा वाढल्याचं विदारक चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 125 रुपयांनी वाढले आहेत.  दिल्लीमध्ये आता 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरचे भाव 794 रुपयांवरुन 819 रुपयांवर आलेत आहेत. ही वाढ सर्वप्रकारच्या म्हणजेच सबसिडी आणि विना सबसिडीच्या गॅस सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: price of cng & png raised know the new new rates delhi ncr