esakal | पेट्रोलच्या थेंबा थेंबाला किंमत; शत्रूघ्न सिन्हांनी शेअर केला भन्नाट व्हिडिओ

बोलून बातमी शोधा

shatru sinha}

देशात भडकलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी केव्हाच पार केली आहे. 

पेट्रोलच्या थेंबा थेंबाला किंमत; शत्रूघ्न सिन्हांनी शेअर केला भन्नाट व्हिडिओ
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

देशात भडकलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी केव्हाच पार केली आहे. तर अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभर रुपयांवर पोहोचणार आहे. त्यामुळे सध्या पेट्रोलच्या थेंबा-थेंबाला मोठी किंमत आली आहे. याचाच प्रत्यय एका व्हिडिओमधून आला आहे. हा भन्नाट व्हिडिओ ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेस नेते शत्रूघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

फडणवीसांच्या सल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला; मोदी सरकारलाही केलं लक्ष्य

शत्रूघ्न सिन्हा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या कारमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल भरताना दिसत आहे. पेट्रोल भरल्यानंतर  हा तरुण पेट्रोलच्या पाईपमध्ये आणि पेट्रोलच्या टाकीच्या तोंडावर पडलेलं संपूर्ण पेट्रोलं टाकीत जावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे पंपावरचा कर्मचारीही त्याला यासाठी मदत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्याचे वास्तव दर्शवणारा व्हिडिओ असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. शत्रूघ्न सिन्हा यांनाही या व्हिडिओनं भुरळ घातली त्यामुळे त्यांनी तो आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला. 

उद्यापासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोना लस, पण वयाची अट; पाहा लसीकरण केंद्रांची यादी

रविवारच्या दिवशी शत्रूघ्न सिन्हा यांनी हा व्हिडिओ शेअर करत संडे स्पेशल ह्युमर असा हॅशटॅगही दिला आहे.  त्याचबरोबर त्यांनी एका मुलाखतीदरम्यान बॉस आणि उमेदवार यांच्यामधील एक संभाषण वजा विनोदही शेअर केला आहे. हा विनोद असला तरी त्यातूनही आजच्या वाढत्या महागाईवर भाष्य करण्यात आलं आहे. सिन्हा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि रिट्विटही केलं आहे.