आता पेट्रोल मिळणार 40 रुपये लिटर!

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जून 2019

- पेट्रोल 40 रुपये प्रतिलिटर मिळण्याची शक्यता 

- प्राध्यापक सतीश कुमार यांनी मांडली ही कल्पना.

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाढत्या दरामुळे वाहनचालक चांगलेच हैराण होत आहेत. मात्र, आता 40 रुपये प्रतिलिटरच्या दराने पेट्रोल मिळण्याची शक्यता आहे. अन् ते पेट्रोल असेल प्लॅस्टिकपासून बनविलेले.

हैदराबाद येथील प्राध्यापक सतीश कुमार यांनी याबाबतची कल्पना आणली. त्यांनी प्लॅस्टिकच्या माध्यमातून पेट्रोलची निर्मिती केली. प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनविण्याच्या प्रक्रियेला त्यांनी 'प्लॅस्टिक पायरोलिसिस' असे नाव दिले आहे.

याबाबत सतीश यांनी सांगितले, की प्लॅस्टिक पायरोलिसिस प्रक्रियेच्या मदतीने प्लॅस्टिकपासून डिझेल, एव्हिएशन इंधन आणि पेट्रोलची निर्मितीही केली जाऊ शकते. पुनर्वापर न होणाऱ्या 500 किलो प्लॅस्टिकपासून 400 लिटर इंधनाची निर्मिती करता येऊ शकते. ही एक सोपी प्रक्रिया आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Price of Petrol may be 40 Rs Per Liter