खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...

वृत्तसंस्था
Tuesday, 17 March 2020

- जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे बसतोय मोठा झटका. 

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे मोठा झटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून शेअर मार्केटमध्ये निर्देशांक घसरले आहेत. याचा परिणाम सोन्याच्या दरावरही झाला आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार कोसळत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होत आहे. त्यानंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याच्या दरात 1949 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रतितोळा सोन्याचे भाव 39 हजार 661 रुपये झाले आहेत.

gold

दरम्यान, राजधानी दिल्लीत काल (सोमवार) सोन्याचा दर 455 रुपयांनी वाढला होता. मात्र, आता सोन्याचे दर कमी झाले आहेत. चांदी 1,283 रुपयांनी घसरून 40,304 रुपये किलो झाली.

Coronavirus : 'फक्त निम्म्याच कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Gold and Sliver Decreased