लवकरच कमी होणार कांद्याचे दर पण वाढणार...

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

- कांदा आणि डाळींच्या किमती वाढल्या मोठ्या प्रमाणात पण आता मिळणार दिलासा.

नवी दिल्ली : कांदा आणि डाळींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढलेल्या किमतीमुळे कांदा सर्वसामान्यांना चांगलाच रडवत आहे. मात्र, आता हा रडवणारा कांदा नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे. याच्या किमतीत घट होणार आहे. तसेच अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाकडे डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे डाळींच्या किमतीही कमी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या बाजारात 8.5 लाख मेट्रिक टन डाळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता डाळींच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कांदा आणि डाळींच्या किमती कमी होणार असल्यातरी साखरेची किमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र

देशात साखरेचे उत्पादन जवळपास 35 टक्क्यांनी कमी झाले असून, 15 डिसेंबरपर्यंत 45.8 टक्के लाख टनवर हा आकडा गेला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्पादनात साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इम्मा) याबाबतची माहिती दिली आहे.

आणखी वाचा - फडणवीसांच्या भारुडाला, उद्धव ठाकरेंचे भारुडानेच उत्तर 

साखर मार्केटिंग वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर यादरम्यान चालते. त्यानुसार ही आकडेवारी जाहीर कऱण्यात आली आहे. मागील मार्केटिंग वर्षात या कालावधीत उत्पादन 70.5 लाख टन इतके साखरेचे उत्पादन होते. 

Image result for onion

उत्तर प्रदेश साखरेच्या उत्पादनात अग्रेसर

उत्तर प्रदेश राज्य हे देशात सर्वांत मोठ्या प्रमाणात साखर उत्पादक राज्य आहे. 15 डिसेंबरपर्यंत 21.2 लाख टन साखर उत्पादित केली गेली. तसेच महाराष्ट्र राज्य देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी 15 डिसेंबरला 29 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

साखर कारखान्यांकडून उशीराने काम

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात साखर उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. दोन्ही राज्यांत साखर कारखान्यांनी उशीराने काम सुरु केले होते. उसाची शेतीही कमी प्रमाणात केली गेली.

Image result for sugar

पुरामुळे साखर उत्पादनाला फटका 

महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे साखर उत्पादन घटले आहे. याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला. गुजरातमध्ये 1.52 लाख टन, बिहारमध्ये 1.35 लाख टन, पंजाबमध्ये 75 हजार टन, तमिळनाडूमध्ये 73 हजार टन, हरियाणामध्ये 65 हजार टन, मध्य प्रदेशात 35 टन आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मिळून 30 हजार टन साखर उत्पादन झाले, अशी माहिती इम्माने दिली.

Image result for डाळ

कांदा मुंबई पोर्टवर दाखल

आयात केलेला कांदा मुंबई पोर्टवर दाखल झाला आहे. तसेच दिल्लीच्या रिटेल मार्केटमध्येही आयात केलेला कांदा दिसत आहे. तसेच डाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Onion are Decreasing but Sugar Prices may Increases