पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; लिटरमागे...

वृत्तसंस्था
शनिवार, 14 मार्च 2020

- पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोदी सरकारकडून वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोदी सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता इंधनाचे दर वाढणार आहेत. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. तसेच इंधनाच्या खर्चात वाढ होणार असल्याने वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, तरीदेखील सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आता पेट्रोल दरवाढीसोबत डिझेलचे दरही तीन रुपयांनी वाढले आहेत. 

Image result for Petrol

दरम्यान, देशातील नागरिकांचा रोष टाळण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची वाढ करण्याची शक्यता धूसर आहे, असे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

5 रुपयांनी पेट्रोल स्वस्त

सव्वादोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता 3 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Petrol and Diesel increased by 3 Rupees