esakal | Video : तुम्ही बसा भांडत, चालले मी...
sakal

बोलून बातमी शोधा

Pride of lions attacks buffalo But wait till you watch the surprise ending

म्हशीला खाण्यासाठी पाचही सिंहांमध्ये भांडण सुरू झाले. सिंहांचं भांडण सुरू असल्याचे पाहून म्हैस उठली व निघून गेली.

Video : तुम्ही बसा भांडत, चालले मी...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः 'दोघांचे भांडण तिसऱयाचा लाभ...' या म्हणीचा प्रत्यय एका म्हशीला आला आहे. पाच सिंहाच्या भाडण सुरू असताना म्हैस निघून गेली अन् ते भांडत बसले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरून दक्षिण आफ्रिकेमधील एका नॅशनल पार्कमधील व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी म्हशीचे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेमधील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये पाच सिंहांनी एका म्हशीची शिकार केली. या म्हशीला खाण्यासाठी पाचही सिंहांमध्ये भांडण सुरू झाले. सिंहांचं भांडण सुरू असल्याचे पाहून म्हैस उठली व निघून गेली. यामध्ये तिचा जीव वाचला आहे. सिहांच्या भांडणाचा म्हसीला लाभ झाला आहे.

प्रवीण यांनी 'सिंहांना चांगलाच धडा मिळाला असेल. जेवण करण्यापूर्वी भांडण करणे महत्त्वाचे होते आणि या गडबडीत जेवण मात्र पळून गेल' या शीर्षकाखाली व्हिडिओ अपलोड केला आहे. हजारो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिला असून, प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.

loading image
go to top