वीज समस्यांवर हवा राज्यनिहाय तोडगा पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा 

narendra modi
narendra modi

नवी दिल्ली  - देशातील वीजेच्या समस्यांवर संपूर्ण देशासाठी एकच उपाययोजना (वन-साइज-फिट्स-ऑल) सुचविण्याऐवजी राज्यनिहाय परिस्थिती पाहून वेगवेगळे उपाय करावेत, त्याचप्रमाणे अपारंपारिक वीजनिर्मितीचे प्रमाण वाढवलेच पाहिजे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. घराच्या छतावर (रूफटॉप) निर्मिती केलेल्या सौर ऊर्जेचा वापर करून सर्व गरजा भागवणारे एखादे शहर प्रत्येक राज्यात असावे अशीही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. 

पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. धोरण निर्णय आखणी, देशातील वीज क्षेत्राच्या दीर्घकालीन समस्यांची सोडवणूक, प्रस्तावित विद्युत विधेयक २०२० आदी मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. देशात सौरऊर्जेचा वापर वाढवत नेण्यावर पंतप्रधानांनी विशेष जोर दिला. किनारपट्टी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सौर तसेच पवन ऊर्जेचा वापर करावा अशी सूचना त्यांनी केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी यांच्या सूचना व अपेक्षा 
- अपारंपारिक क्षेत्राच्या माध्यमातून वीजनिर्मिती वाढविणे 
- ग्राहकांचे समाधान आणि वितरण क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे 
- एकच एक नियमावली लागू करण्यापेक्षा राज्यनिहाय परिस्थिती/ समस्यांचे स्वरूप पाहून योजना आखाव्यात 
- कृषिक्षेत्रासाठी सौरऊर्जेचेसारखा अपारंपारिक ऊर्जेचा पर्याय 
- सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप, शीतगृहे त्यांची संख्या वाढवत नेणे आवश्यक 
- खाद्यपदार्थ व अन्य काही उत्पादनांच्या क्षेत्रातही सौरऊर्जेचा वापर वाढवता येणे शक्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com