पंतप्रधान मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.14) छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते भिलाई स्टील प्लॅन्टच्या विस्तारित प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याशिवाय त्यांच्या हस्ते भिलाई आयआयटी कॅम्पसच्या कोनशिलेचे अनावरण करतील आणि भारतनेट-2 प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्याची घोषणा करतील. या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतींना भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या जातील.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.14) छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते भिलाई स्टील प्लॅन्टच्या विस्तारित प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याशिवाय त्यांच्या हस्ते भिलाई आयआयटी कॅम्पसच्या कोनशिलेचे अनावरण करतील आणि भारतनेट-2 प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्याची घोषणा करतील. या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतींना भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या जातील.

भिलाई प्रकल्पाच्या आधुनिकीकरणामध्ये उत्पादकता, उत्पन्न, गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत आणि पर्यावरणीय संरक्षणातील सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता समाविष्ट आहे, असे याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे. जगदलपूर आणि रायपूर दरम्यानच्या रेल्वेसेवेचेही उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 

Web Title: Prime Minister Modi today on the Chhattisgarh tour