
गरीब कल्याण संमेलनाद्वारे पंतप्रधान मोदी साधणार संवाद
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तास्थापनेला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सिमला (हिमाचल प्रदेश) येथे मंगळवारी (ता. ३१) होणाऱ्या गरीब कल्याण संमेलनात सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणार असलेल्या या कार्यक्रमामध्ये यावेळी पीएम किसान सन्मान निधीचा २१ हजार कोटी रुपयांचा ११ वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालयांचा सहभाग असलेले गरीब कल्याण संमेलन हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे मंगळवारी होणार आहे. या संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे सहभागी होणार आहेत. सरकारी दाव्यानुसार आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा एकत्रित कार्यक्रम असून पंतप्रधान किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन मिशन आणि अमृत, स्वनिधी योजना, ‘वन नेशन – वन कार्ड’, गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्यमान भारत, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर, मुद्रा योजना यासारख्या यात नऊ केंद्रीय मंत्रालयांच्या तसेच विभागांच्या १६ योजनांशी संबंधित लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील. यावेळी १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा ११ व्या हप्त्याची रक्कम जारी केली जाईल.
Web Title: Prime Minister Modi Will Communication Through Garib Kalyan Sammelan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..