पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून करणार विक्रम!

narendra-modi-red-fort.jpg
narendra-modi-red-fort.jpg

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ ऑगस्टला (शनिवारी) लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतील तेव्हा सलग सातव्यांदा तो मान मिळविणारे ते पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान ठरतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक तब्बल १७ वर्षे हा मान मिळाला आहे. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी (६ वर्षे), इंदिरा गांधी (११ वर्षे) व डॉ. मनमोहनसिंग (सलग १० वर्षे) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनी संबोधित केले होते. 

भगवान रामानंतर गौतम बुद्धांना भारतीय म्हटल्याने भडकला नेपाळ!

नरेंद्र मोदी यांच्या नतृत्वाखालील भाजपने २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा कॉंग्रेस आघाडीला धूळ चारून लोकसभेत घवघवीत बहुमत मिळविले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मोदी यंदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतील. यंदाचा स्वातंत्र्यदिन कोरोना महामारीच्या छायेत होत असल्याने या कार्यक्रमावर मर्यादा असल्या तरी डिजीटल माध्यमाद्वारे पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तान व चीनसह देशभरात तत्काळ पोहोचणार आहे. मागील वर्षी मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. यंदा ते स्वतःच विक्रम प्रस्थापित करतील आणि भाजपने हा सोहळा जंगी स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्येही पंतप्रधान झाले होते. मात्र स्वातंत्र्यदिन येण्यापूर्वीच त्यांचे सरकार कोसळल्याने त्यांना त्या वर्षी तो मान मिळाला नव्हता. त्यानंतर १९९९ ते २००३ या काळात त्यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. दरम्यान, लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावणारे पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान सत्तेवर येण्यास देशात १९७७ साल उजाडले. इंदिरा गांधीचा पराभव करून सत्तेवर आलेल्या जनता सरकारचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तो १९७७-७८ या वर्षी मान मिळविला होता. 
----------------------------------- 
लाल किल्ला सर करणारे बिगर कॉंग्रेसी पंतप्रधानः 
मोरारजी देसाई 
चौधरी चरणसिंग 
विश्वनाथ प्रताप सिंह 
एच डी. देवेगौडा 
इंद्रकुमार गुजराल 
अटलबिहारी वाजपेयी 
नरेंद्र मोदी (२०१४ पासून आजतागायत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com