पंतप्रधान मोदी यांचा आज "मन की बात' कार्यक्रम 

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 24) आपल्या "मन की बात' या मासिक कार्यक्रमात आपले विचार देशापुढे मांडणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा "मन की बात'चा हा 45 वा कार्यक्रम असून, सकाळी 11 वाजता त्याचे रेडिओवरून प्रसारण करण्यात येणार आहे. त्याशिवाय एफएम चॅनेल, स्थानिक रेडिओ, कम्युनिटी रेडिओ आणि दूरदर्शन आणि काही खासगी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 24) आपल्या "मन की बात' या मासिक कार्यक्रमात आपले विचार देशापुढे मांडणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा "मन की बात'चा हा 45 वा कार्यक्रम असून, सकाळी 11 वाजता त्याचे रेडिओवरून प्रसारण करण्यात येणार आहे. त्याशिवाय एफएम चॅनेल, स्थानिक रेडिओ, कम्युनिटी रेडिओ आणि दूरदर्शन आणि काही खासगी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे.

रात्री आठ वाजता प्रादेशिक वाहिन्यांच्या माध्यमातून त्याचे पुनर्प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण मोबाईल ऍप आणि ऑल इंडिया रेडिओ लाइवच्या माध्यमातूनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान विविध विषयांवर बोलणार असून, त्याशिवाय सूचना या विषयावरही मत व्यक्त करणार आहे. 

Web Title: Prime Minister Modi's "Mana Ki Baat" program today