पंतप्रधान मोदींकडून 50 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

पीटीआय
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले, की दहशतवादाविरोधात युद्धात श्रीलंकेला भारताचे पाठबळ असून दहशतवाद विरोधी लढ्यात आम्ही श्रीलंकेच्या सोबत आहोत. 

नवी दिल्ली - श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्ष दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले, की दहशतवादाविरोधात युद्धात श्रीलंकेला भारताचे पाठबळ असून दहशतवाद विरोधी लढ्यात आम्ही श्रीलंकेच्या सोबत आहोत. 

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी श्रीलंकेला दहशतवादाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली. या बेटाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याशी फलदायी चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच यावेळी श्रीलंकेच्या विकासाठी 400 दशलक्ष डॉलर्सचे कर्जही श्रीलंकेला देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

नरेंद्र मोदी अंघोळ कुठे करतात माहित आहे का?

याप्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्ष यांनी सांगितले, की दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे. आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे संबंध आमच्यासाठी खुप अत्यंत महत्वपूर्ण आहेत. तसेच, द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येइल असेही त्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi announced 50 million dollars