अनुभवाचा उपयोग जनतेसाठी करा पंतप्रधान मोदींचे राज्यपालांना आवाहन

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

विकासासाठी साह्य आवश्‍यक 
उद्‌घाटनपर भाषणात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अनुसूचित जमातीच्या विकासासाठी साह्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती म्हणाले, की विकासात मागे पडलेल्या या लोकसंख्येचे राहणीमान सुधारण्यात राज्यपाल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यापीठांमध्ये वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविणे, प्राध्यापकांची नियुक्ती करणे यातही राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. 

नवी दिल्ली - देशाची संघराज्य रचना आणि घटनात्मक व्यवस्थेमध्ये राज्यपाल ही संस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 49 व्या राज्यपाल संमेलनामध्ये केले. तर, राज्यपालांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून केंद्राच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी

राष्ट्रपती भवनात आज सुरू झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल संमेलनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. देशभरातील राज्यपाल, नायब राज्यपाल या संमेलनात सहभागी झाले असून, अंतर्गत सुरक्षा, विद्यापीठांमधील उच्च शिक्षण, कौशल विकास, यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. आजच्या उद्‌घाटन कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, कौशल विकासमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्यासह वेगवेगळ्या मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, की आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या राज्यांचे राज्यपाल शिक्षण, क्रीडा आणि आर्थिक लाभाच्या सरकारी योजना आदिवासींपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलगुरूदेखील आहेत, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती सोहळ्यात विद्यापीठे मोलाची कामगिरी बजावू शकतात, असे आवाहन केले. राष्ट्रीय पोषण अभियान, गावांचे विद्युतीकरण आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील विकास कार्यक्रमाची चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी राज्यपालांना, नुकतीच वीज पोहोचलेल्या गावांचा दौरा करण्याचे आवाहनही केले. 

विकासासाठी साह्य आवश्‍यक 
उद्‌घाटनपर भाषणात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अनुसूचित जमातीच्या विकासासाठी साह्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती म्हणाले, की विकासात मागे पडलेल्या या लोकसंख्येचे राहणीमान सुधारण्यात राज्यपाल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यापीठांमध्ये वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविणे, प्राध्यापकांची नियुक्ती करणे यातही राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. 

Web Title: Prime Minister Narendra Modi appeal to the governors please work for people