डेटावर नजर ठेवणारे मोदी 'बिग बॉस' : राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

फेसबुकचा डाटा लिकप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदी हे 'बिग बॉस' असून, त्यांना भारतीयांची टेहळणी करण्यास आवडते. तसेच सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षावर 'चोरी'चा आरोप करत आहे''. 

नवी दिल्ली : फेसबुकचा डाटा लिकप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदी हे 'बिग बॉस' असून, त्यांना भारतीयांची टेहळणी करण्यास आवडते. तसेच सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षावर 'चोरी'चा आरोप करत आहे''. 

data hack

पंतप्रधान मोदी यांचे अधिकृत 'नमो अॅप'वरून युजर्सचा वैयक्तिक आणि महत्वाची माहिती त्यांना कोणतीही कल्पना न देता शेअर केली जाते, असा आरोप केला जात आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले, 'नमो' अॅपवरून युजर्सचा ओडिओ, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट आणि लोकेशन यांसारखा खासगी डाटा ट्रॅक केला जातो. मात्र, पंतप्रधान मोदी हे 'बिग बॉस' असून, त्यांना भारतीयांची टेहळणी करण्यास आवडते. 

दरम्यान, ''हाय, माझे नाव राहुल गांधी. मी भारताच्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही आमच्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमचा सर्व डाटा मी माझ्या सिंगापूरच्या मित्रांना देतो'', असे ट्विट करत भाजपच्या मालवीय यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला.

Web Title: Prime Minister Narendra Modi is Big Boss says Rahul Gandhi