पंतप्रधान मोदी जातीयवादी - राहुल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित-आदिवासी विरोधी आहेत,’ असा थेट हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मोदी हे जातीयवादी असल्याचे शेलके विशेषणही त्यांनी वापरले. विशेष म्हणजे, राहुल गांधी उपोषणासाठी दुपारी १२.४५ च्या सुमारास पोचले. यावरूनही भाजपने त्यांना लक्ष्य केले. ‘राहुलजी, तुमचे दुपारचे जेवण झाल्यावर उपोषणाला बसा,’ असा उपरोधिक सल्ला भाजपच्या अमित मालवीय यांनी दिला. 

सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत असलेल्या या उपोषणाच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ पक्षनेत्यांनी भाग घेतला. उपोषणानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजप व मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपची विचारसरणी ही  जातीयवादी असून, त्याच्या विरोधात हे उपोषण होते, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीच्या विरोधात काँग्रेस पक्ष ठाम उभा आहे आणि यापुढेही लढा देत राहील, असे सांगून राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा केला. 

उपोषणाआधी नाश्‍ता!
राजघाटावरील काँग्रेसजनांचे हे उपोषण दोन कारणांमुळे वादग्रस्त ठरले. भाजपने या उपोषणापूर्वी काँग्रेसचे दिल्लीचे स्थानिक नेते नाश्‍ता घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावरून प्रसारित केले. भाजपचे नेते हरिश खुराना यांनी काँग्रेसच्या नेत्यांची नाश्‍ता करतानाची छायाचित्रे ट्विटरवर अपलोड केली. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन आणि अरविंदरसिंग लव्हलीही दिसत आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेसवर प्रचंड टीका सुरू झाल्यानंतर लव्हली यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘हे बेमुदत उपोषण नाही. फक्त प्रतीकात्मक उपोषण आहे,’ असे त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांना काय झाले आहे, हे समजतच नाही. देश व्यवस्थित चालविण्याऐवजी आम्ही काय खात आहोत, याकडेच त्यांचे लक्ष आहे, असे लव्हली म्हणाले. उपोषणात सामील होण्यासाठी आलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही.

Web Title: prime minister narendra modi Casteist rahul gandhi politics