मोदी झाले रणगाड्यावर स्वार, व्हिडिओ पाहिला? 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

पंतप्रधानांनी स्वतः याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, विरोधकांना एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे. या तोफांच्या निर्मितीसाठी सुरतपासून 30 किमी अंतरावर हजीरा येथे प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रणगाड्यावर स्वार झालेल्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा असून, ऐन निवडणुकीपूर्वी मोदी तोफेवर स्वार झाल्याचे बोलले जात आहे.

सुरतमधील हजीरा येथे लार्सन अँड टूब्रो (एलअँडटी) यांनी होवित्झर या तोफेची निर्मिती केली आहे. या तोफेच्या उद्घाटनप्रसंगी मोदींना स्वतः तोफेवर स्वार होण्याचा मोह आवरला नाही.

पंतप्रधानांनी स्वतः याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, विरोधकांना एक प्रकारे इशाराच देण्यात आला आहे. या तोफांच्या निर्मितीसाठी सुरतपासून 30 किमी अंतरावर हजीरा येथे प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

Web Title: prime minister Narendra Modi checking out the tanks at l and ts armoured systems complex in hazira