Narendra Modi : पंतप्रधानांच्या सोहळ्यासाठी २१ झाडांचा बळी Prime Minister Narendra Modi Nagpur Medical hundred trees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधानांच्या सोहळ्यासाठी २१ झाडांचा बळी

नागपूर : येत्या डिसेंबरमध्ये मेडिकलला ७५ वर्षे पूर्ण होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी २१ झाडांचा बळी दिला जाणार आहे. याशिवाय पेईंग वॉर्ड व विद्यार्थी वसतीगृहाच्या नव्या बांधकामासाठीही झाडे तोडली जाणार आहे. मेडिकलने एकूण चारशे झाडे तोडण्याची परवानगी मागितली असून महापालिकेने यावर आक्षेप मागविले आहेत. पर्यावरणप्रेमींनी यावर आक्षेप नोंदविले असल्याचे सूत्राने नमूद केले.

रुग्ण व विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी मेडिकल प्रशासन विकासकामे करीत आहे. तीन वेगवेगळ्या प्रकल्पासाठी मेडिकलने चारशे झाडे कापण्याची परवानगी मागितल्याचे महापालिका उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी नमूद केले. महापालिकेने मेडिकलला अद्याप परवानगी दिली नाही. परंतु झाडे कापण्यासंदर्भात नागरिकांकडून आपेक्ष मागविण्यात आले असल्याचे चौरपगार यांनी स्पष्ट केले.

यावर्षी डिसेंबरमध्ये मेडिकलच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त मोठा सोहळा मेडिकलने आयोजित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे मेडिकलने महापालिकेकडे केलेल्या अर्जातून दिसत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी २१ झाडांचा अडथळा येत असून ते तोडण्यासाठी मेडिकलने पहिला अर्ज केला. त्यांतर पेईंग वॉर्डसाठी ८० खोल्या बांधण्यासाठी ८६ झाडे तर विद्यार्थ्यांसाठी ४०० खोल्यांचे वसतिगृह बांधण्यात येणार असून त्यासाठी १८७ झाडे तोडण्याची

मेडिकल चारशे झाडे कापणार

परवानगी मेडिकलने महापालिकेकडे मागितली. परंतु याबाबत महापालिकेने तपासणी केल्यानंतर कापण्यात येणाऱ्या झाडांची संख्या २९४ पर्यंत कमी करीत १०० झाडे वाचविल्याचा दावा मनपा अधिकाऱ्याने केला.

महापालिकेने आता पुढील हरकती, आक्षेप मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु अजनी वन वाचविण्यासाठी सरसावलेल्या पर्यावरणप्रेमींनी मेडिकलच्या इच्छेवरही आक्षेप नोंदविले असल्याचे सूत्राने नमूद केले.

मेडिकल प्रशासनाने तीन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोडण्याकरिता अर्ज केले आहेत. मेडिकलला अद्याप परवानगी दिली नाही. मेडिकलच्या अर्जावर नागरिकांकडून आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत.

- अमोल चौरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.