esakal | पंतप्रधान मोदींनी 29 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ; अयोध्येत येताच झाली पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

narendra-modi-in-ayodhya.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 वर्षांपूर्वी घेतलेली शपथ आज पूर्ण झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी 29 वर्षांपूर्वी घेतली होती शपथ; अयोध्येत येताच झाली पूर्ण

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 वर्षांपूर्वी घेतलेली शपथ आज पूर्ण झाली आहे. मोदी यांनी 1991 साली अयोध्येला भेट दिली होती. यावेळी त्यांना एका पत्रकाराने विचारले होते की यानंतर तुम्ही केव्हा अयोध्येला येणार. यावर उत्तर देताना 'जेव्हा राम मंदिर सत्यात येईल, तेव्हाच मी अयोध्येत येईन; असं मोदी म्हणाले होते. त्यानंतर आज तब्बल 29 वर्षांनी मोदी अयोध्येत आले आहेत. आज मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे.  

राहुल गांधींनी राम मंदिर भूमिपूजनानंतर केलं ट्विट; म्हणाले

पंतप्रधान मोदी 29 वर्षांपूर्वी म्हणजे 1992 साली अयोध्येमध्ये गेले होते. यावेळी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात एकता यात्रा निघाली होती. या यात्रेमध्ये मोदी सहभागी झाले होते. ही यात्रा काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकण्याच्या मागणीसाठी काढण्यात आली होती. 1991  साली कन्याकुमारी येथून निघालेली ही यात्रा 18 जानेवारी 1992 साली अयोध्येत पोहोचली होती. मुरली मनोहर जोशी यांनी नरेंद्र मोदींसोबत फैजाबाद येथील जीआइसी मैदानात सभा घेतली होती. यावेळी डॉ. जोशी आणि मोदी यांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर मोदी कधीही अयोध्येत आलेले नाहीत.

1992 नंतर मोदी गुजरातमध्येच गुंतून गेले. मोदी येथूनच राम मंदिराच्या उभारणीसाठी वैचारिक पाठिंबा देण्याचे काम करत होते. मोदी 2009 साली अयोध्येपासून जवळच असलेल्या फैजाबाद येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळेही त्यांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यानंतर 2014 साली पहिल्यांदा लोकसभा लढताना प्रचारासाठी त्यांनी फैजाबादमध्ये सभा घेतली होती. 2019 सालीही त्यांची फैजाबद येथे सभा झाली, पण त्यांनी जवळ असणाऱ्या रामलल्लाचं दर्शन घेणं टाळलं होतं. मात्र आता, अनेक वर्षांनतर राम मंदिराचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी अयोध्येत उपस्थिती लावली. एका अर्थाने इतिहासाचे एक वर्तुळ आज पूर्ण झालं आहे. 

पंतप्रधान मोदींचा रामलल्लासमोर 'साष्टांग नमस्कार'; फोटो व्हायरल

दरम्यान, भाजपची स्थापना 1980 साली झाली. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तेव्हा राम मंदिरासंदर्भात एक आंदोलन सुरु केले होते. 1984 झाली जेव्हा भाजपने पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी राम मंदिरासाठी रथ यात्रेचे आयोजन केले होते. त्यानंतर 1992 साली बाबरी मशिद पडली यासर्वांचा भाजपला निवडणुकीत फायदा झाला होता. 

loading image