मोदीजी, प्रचार संपला असेल तर पत्रकारपरिषदेलाही सामोरे जा !

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. 

नवी दिल्ली- प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी हाती घेऊन इतके दिवस झाले. आता मोदींनी पत्रकार परिषद चारी बाजूने होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमाराचा आनंद घेतला पाहिजे, असा टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला आहे.
 

हैदराबाद येथील पत्रकार परिषदेतील काही छायाचित्रेही त्यांनी शेअर करत म्हटले आहे की, तुमच्यासाठी पत्रकार परिषदेची छायाचित्रे तुमच्यासाठी शेअर करत आहे. कधीतरी प्रयत्न करा. प्रश्नांच्या भडीमाराचा सामना करणे मजेशीर असते, असे टोला त्यांनी लागावला आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi Once Face Press Conference Rahul Gandhi