जगातील तीन अव्वल नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी दिल्ली  - 'गॅलप इंटरनॅशनल' या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, जगातील तीन अव्वल  नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला आहे. 

'गॅलप इंटरनॅशनल'च्या सर्वेक्षणात जगातील 50 देशांतील नेत्यांचा यासाठी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जगातील तीन अव्वल नेते निवडण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर्मनच्या चांसलर अंजेला मार्केल, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन तर तिसऱ्या स्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमांक लागला आहे.

चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना मागे टाकून मोदींनी हे स्थान राखले. 

Web Title: Prime Minister Narendra Modi ranks third in global leaders survey