पंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल ; पुरपरिस्थितीचा आढावा घेणार

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पंतप्रधान मोदी आज (शनिवार) केरळच्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली होती. यादरम्यान पंतप्रधानांनी केंद्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे मोदींनी सांगितले. 

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले आहेत. 

पंतप्रधान मोदी आज (शनिवार) केरळच्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली होती. यादरम्यान पंतप्रधानांनी केंद्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे मोदींनी सांगितले. तिन्ही संरक्षण दले, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. राज्यात नौदलाच्या 42 तर लष्कराच्या 12 तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करत आहेत.

दरम्यान, केरळमधील या नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी कोची येथे दाखल झाले असून, काही वेळातच ते येथील पुरपरिस्थितीचा आढावा घेतील. 

Web Title: Prime Minister Narendra Modi reached in Kerala