जैवअर्थव्यवस्था आठपटीने वाढली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी : उद्योगस्नेही वातावरणामुळे स्टार्टअपही वाढले
Prime Minister Narendra Modi statement bioeconomy grew eight times industry startups boosted delhi
Prime Minister Narendra Modi statement bioeconomy grew eight times industry startups boosted delhisakal

नवी दिल्ली : मागील आठ वर्षांमध्ये देशाची जैव अर्थव्यवस्था आठपटीने वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्राला बळ देत आहे. याआधी काही निवडक क्षेत्रांना बळ देतानाच अन्य क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले जात होते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते येथे आयोजित बायोटेक स्टार्टअप एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मोदी म्हणाले, ‘‘देशाची जैव अर्थव्यवस्था मागील आठ वर्षांमध्ये आठपटीने वाढली असून तिची व्याप्ती १० अब्ज डॉलरवरून ८० अब्ज डॉलरवर पोचली आहे. आपला देश लवकरच बायोटेक क्षेत्रातील दहा आघाडीच्या वैश्विक इकोसिस्टिममध्ये सहभागी होईल. मागील आठ वर्षांच्या काळामध्ये देशातील स्टार्टअपची संख्या शेकडोतून ७० हजारांवर पोचली आहे.

केंद्र सरकारने देशामध्ये उद्योगस्नेही वातावरण तर तयार केलेच पण त्याचबरोबर नवउद्यमशिलतेला पोषक अशी संस्कृतीला जन्म दिला. देशातील साठ वेगवेगळ्या उद्योगांमध्ये तब्बल ७० हजार स्टार्टअप तयार झाले आहेत. नवे टॅलेंट या क्षेत्रामध्ये येते आहे. बायोटेकमधील गुंतवणूकदार नऊ पटीने तर बायोटेक इनक्युबेटर आणि त्यासाठीचा निधी पुरवठा देखील सातपटीने वाढला आहे. इक्युबेटर्सची संख्या सहावरून ७५ वर पोचली आहे तर बायोटेक उत्पादनांची संख्याही आज दहावरून सातशेवर गेली आहे. काही क्षेत्रातील निर्यातीने उच्चांक गाठला असून प्रत्येक क्षेत्राला आधार देत त्याच्या विकासाला हातभार लावणे ही देशाची गरज असून केंद्र सरकार देखील प्रत्येक आघाडीवर संधी पडताळून पाहते आहे. देशाच्या विकासाला एका उंचीवर नेण्यामध्ये बायोटेक क्षेत्राचा मोठा वाटा आहे.’’

भारतावर जगाचा विश्वास

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय व्यावसायिकांच्या प्रतिष्ठेमध्ये भरच पडते आहे. भारतीय आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि संशोधनावर जगाचा विश्वास आहे. आता बायोटेक सेक्टरमध्ये याच दशकामध्ये हाच विश्वास आणि प्रतिष्ठा वाढताना दिसून येते. भारतात लोकसंख्येबाबत असलेले वैविध्य आणि वेगवेगळे क्लायमेट झोन, युवा टॅलेंट, उद्योगस्नेही वातावरण तयार व्हावे म्हणून केले जाणारे प्रयत्न, जैव उत्पादनांची भारतामध्ये वाढत जाणारी मागणी यामुळे भारतात या क्षेत्रात खूप मोठ्या संधी निर्माण झाल्याचे दिसून येते, असे मोदींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com