esakal | 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडली जाणार 'ही' शहरे; PM मोदींच्या हस्ते आठ रेल्वेंचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

statue of unity

आठ शहरे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडले गेल्याने देशातील पर्यटकांना इथे येण्यासाठी मोठी सोय उपलब्ध होईल.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडली जाणार 'ही' शहरे; PM मोदींच्या हस्ते आठ रेल्वेंचा शुभारंभ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी गुजरातच्या केवाडियामध्ये व्हिडीओ कॉन्फरंन्सिद्वारे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडणाऱ्या आठ रेल्वेंना सकाळी 11 वाजता हिरवा झेंडा दाखवून शुभांरभ करणार आहेत. या रेल्वे सकाळी केवाडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पासून वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरशी जोडल्या जातील. केवाडिया रेल्वे स्टेशन अनेक सोयी-सुविधांनी युक्त आहे. हे देशातील पहिले ग्रीन बिल्डींग सर्टिफिकेट वाले रेल्वे स्टेशन आहे.  

आठ शहरे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडले गेल्याने देशातील पर्यटकांना इथे येण्यासाठी मोठी सोय उपलब्ध होईल. तसेच यामुळे पर्यटनास चालना मिळून आर्थिक उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जानेवारीला अहमदाबाद मेट्रो परियोजनाच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच सूरत मेट्रो रेल्वे परियोजनेसाठी भूमी पूजन करतील. पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी याबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी देखील उपस्थित राहतील.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे परियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 28.25 किलोमीटरचे दोन कॉरिडॉर असतील. पहिला कॉरिडॉर मोटेरा स्टेडीयमपासून महात्मा मंदिर पर्यंत असेल. याची एकूण लांबी 22.83 किमी असेल तर दुसरा कॉरिडोर जीएनएलयूपासून गिफ्ट सिटीपर्यंत असेल आणि याची एकूण लांबी 5.41 किमी असेल. या परियोजनांसाठी एकूण 5384.17 कोटी रुपये खर्च येणार आहे. एकूण 40.35 किमी लांबीच्या दोन मेट्रो रेल्वेच्या परियोजनेसाठी अंदाजे खर्च 12020.32 कोटी रुपये आहे.