पंतप्रधान मोदींनी दिले भाजप-आरएसएसच्या नेत्यांना 'डिनर'चे निमंत्रण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि तीन राज्यांमध्ये यावर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात पंतप्रधान मोदी भाजप नेते आणि आरएसएसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे ही डिनर पार्टी महत्वपूर्ण मानली जात आहे.  

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांना आज (शुक्रवार) 'डिनर'चे निमंत्रण दिले. या डिनरदरम्यान पंतप्रधान मोदी आगामी निवडणुकांबाबत मंथन करणार आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि तीन राज्यांमध्ये यावर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात पंतप्रधान मोदी भाजप नेते आणि आरएसएसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे ही डिनर पार्टी महत्वपूर्ण मानली जात आहे.  

भाजप आणि आरएसएसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक हरियानाच्या सूरजकुंडमध्ये गुरुवारी सुरु करण्यात आली होती. मिशन लोकसभा 2019 रणनीति तयार करण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. ही अनौपचारिक बैठक असणार आहे. पंतप्रधान मोदींनी मागील वर्षीही डिनरचे आयोजन केले होते. त्यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी एकत्र आले होते. 

Web Title: Prime Minister Narendra Modi Will Host A Dinner Meeting For Key Leaders Of The RSS And BJP Today